*महीलांसाठी जनसंपर्क कार्यालय ; तहसिलदारांचा हस्ते उद्घाटन*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी
गोंडपीपरी तालुक्यातील महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या निवारणासाठी जनसंपर्क कार्यालय थाटण्यात आले.गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.सौ.रेखा रामटेके यांनी कार्यालय स्थापणेसाठी पुढाकार घेतला.
गोंडपीपरी तालुक्यातील महीलांना शासनाच्या विविध योजनाची माहिती देणे,लघु उदयोग, गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे, महिला सक्षमीकरण व सबलीकरण तसेच महिलांच्या विविध समस्या निवारणासाठी गोंडपिपरीत जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले. गोंडपीपरी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.रेखाताई रामटेके यांनी पुढाकार घेतला.एका महीलेने महीलांसाठी उघडलेले हे पहीले कार्यालय असावे,असे मत सौ.रामटेके यांनी व्यक्त केले.जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार अशी हमी सौ.रामटेके यांनी दिली.जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन गोंडपीपरीचे तहसिलदार के.डी. मेश्राम यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी पाटील मॅडम, सुरेशराव चौधरी, संभु येलेकर, तुकाराम झाडे,देवेंद्र बटटे, सपना साखलवार यांची उपस्थिती होती.