*आष्टी पोलिस स्टेशन चे दंबग पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांची दबंगगिरी तक्रारदारास बेदम मारहाण*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांची हूकूमशाही मुजोरी अगदी शिघेला पोहचली असून ” हम करे सो कायदा ” अशी परिस्थिती आष्टी पोलिस स्टेशन मध्ये निर्माण झाली आहे अगोदरच आष्टी पोलिस स्टेशन या ना त्या कारणाने बदनाम आहे चामोर्शी तालुक्यातील व आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कडोली या गावातील प्रफुल ताराचंद श्रीरामे या तरुणाने आष्टी पोलिस स्टेशन मध्ये बंडू सोयाम व कूंदा सोयाम यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता आष्टी पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक जंगले यांनी प्रफुल या व्यक्तीची तक्रार न घेता त्याला एका खोलीत बंद करून लाथा ..बुक्यानी ..पोटावर.. हातावर ..पायावर ..माणेवर ..व छातीवर बेदम अशी जिवघेणी मारहाण केली तसेच तक्रारदारास दिड ते दोन तास पोलिस स्टेशन च्या बाहेर पाण्यात उभे ठेवले तक्रारकर्ताचा आई व पत्नी पुढे अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच आई व पत्नी यांची मानहानी पण केली आहे
यापुढे जर तु पुन्हा तक्रार दाखल करण्यासाठी आष्टी पोलिस स्टेशन ला आल्यास ..आष्टी परीसरात तुला फिरकू देणार नाही असी धमकी दमदाटी सुध्या आष्टी येथील पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी तक्रारदारास दिली प्रफुल सिडाम यांना होत असलेली जिवघेणी मारहाण व होत असलेल्या वेदना बघून आष्टी पोलिस स्टेशन चे महीला उपनिरीक्षक यांनी स्वतः पुढाकार घेऊन रात्रो दिड ते दोन वाजताच्या दरम्यान तक्रार दाराची तोंडी रिपोर्ट लिहून घेतली प्रफुल सिडाम यांना गंभीर स्वरूपाची मारहाण असून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तक्रार दाराने सदर घटनेची तक्रार पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना दिलेली असून आष्टीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी सुध्धा केली आहे ..या भयंकर मारहाणीच्या घटणेमूळे तक्रार दार भयभीत झालेला असून .. प्रफुल सिडाम यांच्या जिवीतास केव्हाही धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा वरीष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष वेधून अन्यायग्रस्ताला योग्य न्याय द्यावा ..
आणी दोषी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांना तात्काळ बडतर्फ करून पुढील चौकशी सुरू करावी अशी मागणी केली जात आहे
जिल्हा पोलिस प्रशासन सदर प्रकरणात कशा प्रकारे न्याय देणार आहे या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे