वृक्ष बियांच्या दहीहंडी ने गोकुळाष्टमी साजरी. – आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचा अभिनव उपक्रम.

46

वृक्ष बियांच्या दहीहंडी ने गोकुळाष्टमी साजरी.
– आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचा अभिनव उपक्रम.

वृक्ष बियांच्या दहीहंडी ने गोकुळाष्टमी साजरी. - आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचा अभिनव उपक्रम.
वृक्ष बियांच्या दहीहंडी ने गोकुळाष्टमी साजरी.
– आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचा अभिनव उपक्रम.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

सविस्तर वृत्त खालील प्रमाणे आहे,राजुरा
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळराजुरा द्वारा संचलित आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना इको क्लबच्या वतीने विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात वृक्ष बियांची दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष बा.शी.प्र.मं. यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्कर येसेकर, संचालक अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सत्यपाल कातकर, पालक प्रतिनिधी सागर राचर्लावार, गर्गेलवार, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक एस.डी. जांभुळकर, प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एन.पी.पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे संकलन केलेल्या बिया दहीहंडी मध्ये टाकून वृक्ष बियांची दहीहंडी सतीश धोटे यांच्या हस्ते फोडून गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. विविध बिया संकलित केल्यानंतर त्याची रोपे तयार करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम यानिमित्ताने राबविला जाणार आहे. प्रत्येक सण समारंभाला पर्यावरणाची जोड देत पर्यावरण संरक्षणाचे काम करीत विविध उपक्रम प्रत्यक्षात राबवून विध्यार्थीच्या साह्याने पर्यावरण संतुलनाचे कार्य राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून करण्यात येते याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका रोशनी कांबळे यांनी केले. प्रास्ताविक ज्योती कल्लूरवार यांनी तर आभार बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.4