वणी तालुक्यातील सुखनेगाव शिवारातील वाघाच्या अस्तित्वाने पंचक्रोशीत दहशत*

53

वणी तालुक्यातील सुखनेगाव शिवारातील वाघाच्या अस्तित्वाने पंचक्रोशीत दहशत*

वणी तालुक्यातील सुखनेगाव शिवारातील वाघाच्या अस्तित्वाने पंचक्रोशीत दहशत*
वणी तालुक्यातील सुखनेगाव शिवारातील वाघाच्या अस्तित्वाने पंचक्रोशीत दहशत*

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836

यवतमाळ : -पावसाळ्याची लगबग लागताच, बळीराजा हा शेतकामाला सुरुवात करतो. त्यामुळे त्याला दिवस-रात्र शेतामध्ये काम करीत काढावी लागतात.त्यामुळे शेतमालका सोबतच त्याची आयुष्यभराची भाकर असलेली बैलजोडी सुद्धा त्याच्यासोबत अविरत काम करत असते. त्यामुळे या शेतकऱ्याच्या राजा- सर्जावर जनावराने हल्ला केल्यास, शेतकऱ्याला किती विदारक परिस्थिती येते. हे फक्त बळीराजा समजू शकतो. असाच काहीसा प्रकार ,तालुक्यातील सुकनेगाव शिवारात घडलेल्या घटनेवरून लक्षात येत आहे. सविस्तर वृत्त असे की,तालुक्‍यातील सुखनेगाव शिवाराततील गजानन रामकृष्ण धांडे यांच्या शेतात आज (1डिसें. बुधवार) दु.२ वाजताच्या सुमारास घडली. धांडे यांच्या शेतामध्ये काम करत असलेल्या बैलावर, झुडपात लपून असलेल्या वाघाने हल्ला चढविला, ही बाब शेतमजुरांच्या लक्षात येताच त्यांनी वाघाला पांगवण्यासाठी आरडा-ओरड केली. त्यामुळे झुडपात लपुन असलेल्या वाघाने पळ काढला. परंतु शेत कामाच्या सुरुवातीच्या दिवसातच गजानन धांडे यांच्या बैलजोडीचे झालेले नुकसान पाहता, वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी जोर धरत आहे. त्यासोबतच शिवारामध्ये असलेल्या वाघाचा वावर बघतात.। संपूर्ण पंचक्रोशी मध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली आहे.त्यामुळे या वाघाची वन-विभागाणे लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी गावातील जनते मधून जोर धरत आहे.