आदर्श हायस्कुल येथील इयत्ता दहावी च्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार संपन्न. – साप -मानव संघर्ष टाळणाऱ्या सर्पमित्रांचाही केला सत्कार.

51

आदर्श हायस्कुल येथील इयत्ता दहावी च्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार संपन्न.

– साप -मानव संघर्ष टाळणाऱ्या सर्पमित्रांचाही केला सत्कार.

आदर्श हायस्कुल येथील इयत्ता दहावी च्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार संपन्न. - साप -मानव संघर्ष टाळणाऱ्या सर्पमित्रांचाही केला सत्कार.
आदर्श हायस्कुल येथील इयत्ता दहावी च्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार संपन्न.
– साप -मानव संघर्ष टाळणाऱ्या सर्पमित्रांचाही केला सत्कार.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा ,खलील वृत्त असे आहे
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचलित आदर्श हायस्कूल येथील सत्र 2020-21 मधील इयत्ता दहावी च्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष बा.शी.प्र.मं. यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्कर येसेकर, संचालक अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर, पालक प्रतिनिधी सागर राचर्लावार, गर्गेलवार, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक एस.डी. जांभुळकर, प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एन.पी.पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय राजय्याजी बेजंकिवार स्मृती प्रित्यर्थ बा. शी. प्र. मं. संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाशराव बेजंकीवार यांच्या तर्फे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. शाळेतून प्रथम साक्षी गर्गेलवार, द्वितीय शितल बाजगीर, तुतीय मनीष रागीट यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी साप- मानव संघर्ष टाळणाऱ्या सर्पमित्रांच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती म्हणून प्रवीण लांडे, रतन पचारे, विजय पचारे, अमर पचारे संदीप आदे, प्रवीण दुर्बडे, सुजित कावळे आदि सर्प मित्रानां संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे यांच्या तर्फे भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मेघा वाढई यांनी केले. प्रास्ताविक सारीपुत्र जांभुळकर यांनी तर आभार बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा च्या सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.