सचिन महाजन वडणेर भिवापूर.प्रवीण जुनघरे व हरीश हटवार यांनी मातीचे परीक्षण

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भिवापूर येथे मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ वतीने माती परिक्षण उपक्रम राबविण्यात आला.या महाविद्यालयाचे विद्यार्थीनी प्रवीण जुनघरे व हरीश हटवार यांनी मातीचे परीक्षण करून शेतकऱ्यांना उपयोगी मार्गदर्शन केले.प्रयोगशील शेतकरी किशोर हुलके यांच्या शेतात हा उपक्रम राबविण्यात आला.या महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून माती परीक्षणासाठी किशोर हुलके यांच्या शेताची निवड करण्यात आली. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आर.अ.ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही.कडू, कार्यक्रम अधिकारी शुभम सरप सर, डॉ.प्रतिक बोबडे सर, के. टी.ठाकरे सर, प्रणिता चवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.