*टेंभा येथे घरावर विज कोसळल्या मुळे मोठे नुकसान*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
*वडनेर* वार्ताहर:-01.09.2021स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील टेंभा येथे दि.30/08/2021 ला श्री. प्रमोद वरभे यांच्या घरावर विज कोसळल्या मुळे घरातील साहित्याचे व घराचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रमोद वरभे यांचे घरातील 2 फॅन, 1 फ्रिज, 1 टीव्ही आणि मोबाईल यांचे अंदाजे 50000 रुपयाचे नुकसान झाले तर त्यांच्या घराला लागूनच असेलेले विनोद वरभे यांचे 1 टीव्ही, 2 फॅन असे 15000 रुपये नुकसान , संजय उगेमुगे यांचे घरातील 1 फ्रिज, 2 फॅन असे 20000 रुपयाचे नुकसान, अंकुश महाजन यांच्या घरचे 1 फॅन, 1 टीव्ही आणि घरातील पूर्ण इलेक्ट्रिक विदयुत प्रवाह शॉट झाल्यामुळे 20000 रुपयाचे नुकसान, हनुमान हुलके यांच्या घरातील 2 फॅन, 1 टीव्ही असे 15000 रुपयाचे नुकसान तर गजानन तडस यांचे घरचे 1 फॅन असे 2000 रुपयाचे नुकसान त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पंचायत टेंभा चे 10 स्ट्रीट लाईट तुटल्यामुळे यांचे ग्रामपंचायत चे सुद्धा मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने याची पाहणी आणि पंचनामे करून शासनाने नुकसान ग्रस्ताना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी व सरपंच यांनी केली.