भायखळा ‘ई’ विभाग अन् हातिव गांव बौध्दजन पंचायत’च्या माध्यमातून “पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप”

58

भायखळा ‘ई’ विभाग अन् हातिव गांव बौध्दजन पंचायत’च्या माध्यमातून
“पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप”

भायखळा 'ई' विभाग अन् हातिव गांव बौध्दजन पंचायत'च्या माध्यमातून "पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप"
भायखळा ‘ई’ विभाग अन् हातिव गांव बौध्दजन पंचायत’च्या माध्यमातून
“पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप”

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०

चिपळूण : महाप्रलयकाळी पावसांने हाहाकार माजवल्यांने कोकणातील महाड, चिपळूण, खेडसह कोल्हापूर, सांगली भागातही पुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती तर, काही ठिकाणी दरड दुर्घटनेमुळे जीवीतहानी होऊन सर्व जनजीवनचं विस्कळीत अन् संसार उध्वस्त झाले होते. अशा ओढवलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येऊन, अत्यावश्यक संसारपयोगी वस्तू अन् आर्थिक मदत करण्यात आली. कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या आवाहनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग अन् हातिव गांव बौध्दजन पंचायत संघाच्या माध्यमातून २०० पुरग्रस्त विद्यार्थ्यांना एक स्कूल बैग, एक कंपास बॉक्स, सहा वह्या, दोन पेन, पेन्सिल बॉक्स, एक कापडी मास्क इत्यादी शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चिपळूण येथे २९ ऑगस्ट २०२१ रोजी १४ शाळेंच्या शिक्षक अन् मोजक्या विद्यार्थ्यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष गमरे सर, सभापती रिया कांबळे, शिक्षण अधिकारी नाईक यांच्या उपस्थित शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ई विभागाचे सुगत पडेलकर, सुर्यसेन जाधव, केशव यादव, साळुंके तसेच सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, युसुफ चौगुले तर, हातिव गांव बौध्दजन पंचायत संघाचे अध्यक्ष प्रकाश शिवगण, उपाध्यक्ष दिपक शिवगण, ए.डी. साळुंके, जयप्रकाश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संजय मोरे, सोलंकी अन् इतर कर्मचाऱ्यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात “विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शिक्षणात खंड पडता कामा नये हि जबाबदारी समाजानेही स्विकारायला पाहिजे असे वक्तव्य करुन, महापुरुषांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष अन् त्यांचे देशावर असलेल्या उपकारांचीही जाणीव करुन दिली.” तर, शिवगण यांनी विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०