ब्रम्हपुरी नगरपरिषदच्या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा* :- जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी…. :- गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…. :- ब्रम्हपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी…..

54

*ब्रम्हपुरी नगरपरिषदच्या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा*

:- जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी….

:- गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा….

:- ब्रम्हपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी…..

ब्रम्हपुरी नगरपरिषदच्या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा* :- जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी.... :- गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.... :- ब्रम्हपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी.....
ब्रम्हपुरी नगरपरिषदच्या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा*
:- जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी….
:- गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा….
:- ब्रम्हपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी…..

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी नगरपरिषदेने शहरात खनिज निधी अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम मोठ्या जोमात सुरू आहेत. ब्रम्हपुरी शहरातील रोडचे खोदकाम करून पाईप लाईन टाकण्यात येत आहे.

ब्रम्हपुरी शहरालगत खेडमक्ता ही स्वतंत्र ग्रामपंचायत असुन ब्रम्हपुरी शहरात सुरू असलेल्या पाईप लाईन चे खोदकाम करण्याअगोदर संबंधित विभागा कडून रितसर परवानगी घेण्यात आली नाही. ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा कोणत्याही प्रकारचा भाग खेडमक्ता ग्रामपंचायत हद्दीत नसताना सुद्धा पाणी पुरवठा पाईप लाईन चे अनाधिकृत खोदकाम सुरू आहे.
सदर खोदकाम नागरिकांच्या येणे – जाण्यासाठी मुख्य रस्ता असुन यावर सुमारे चार फूट रुंद व बारा फुट लांब असे खोदकाम अनाधिकृत खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुचना फलक, बॅरिकेड्स,इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्त्याने जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम जात असताना खोदकाम करणाऱ्या कामगारांना विचारले असता सीईओ (मुख्याधिकारी) साहेबांचा आदेश असल्याचे सांगितले. सदर मौक्यावर खेडमक्ता ग्रामपंचायत चे उपसरपंच दिपक देशमुख, शेखर बोरघरे, महेश सोनकुसरे, गणीखॉ मेश्राम, उपस्थित होते. काही वेळातच ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर त्या ठिकाणी पोहोचले. जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम या लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित असताना सुध्दा उपसरपंच व गावातील नागरिकांना जोरजोराने शिवीगाळ करून ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. व तिथून निघून गेले. सदर केलेले खोदकामने अपघातास आमंत्रण दिले जात आहे. या रस्त्याने खेडमक्ता येथील नागरिकांना ब्रम्हपुरी शहरात कामानिमित्त दुचाकी, चारचाकी ने प्रवास करावे लागते. आणि सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर खोदकाम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी रितसर परवानगी घेतली नाही. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आले नाही. असे बेजबाबदार, वादग्रस्त मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आली.

प्रतिक्रिया:-
सदर खोदकाम आज सुरू करण्यात आले होते आणि ते खोदकाम पुर्ण बुजविण्याचे सुध्दा काम करणार होते. पण उपसरपंच येऊन कामात अडथळा निर्माण केला. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या सुध्दा उपस्थित होत्या. कुठल्याही प्रकारची शिवीगाळ करण्यात आली नाही. उपसरपंच हा एकेरी शब्दाचा वापर करून कामगारांना बोलत होता. सदर खोदकाम झालेल्या ठिकाणी बॅरेकॅटस लावण्यासाठी सांगितले आहे. सदर आरोप बिनबुडाचे आहेत.

मंगेश वासेकर
मुख्याधिकारी
नगरपरिषद ब्रम्हपुरी