केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेही आपला माल विकता येणार आहे – ना. संजय धोत्रे

56

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेही आपला माल विकता येणार आहे – ना. संजय धोत्रे

या कायद्यामुळे कृ. उ.बा.समिती बंद होणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही. सर्वार्थाने हा कायदा शेतकरी हिताचा आहे. कायद्यातील सुधारणे मुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे.


विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम:- केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विकास सुधारित कायदा . हे शेतकऱ्यांना अत्यंत लाभकारी ठरणार आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्याचा स्वतःचा माल भारतात हव्या त्या ठिकाणी त्याला पाहिजे त्या भावात विकू शकतो. याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारत स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदाच शेतकऱ्याला स्वतःचा माला विकण्याच स्वतंत्र मिळणार आहे. या कायद्यामुळे कृ. उ.बा.समिती बंद होणार नाहीत आणि शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होणार नाही. सर्वार्थाने हा कायदा शेतकरी हिताचा आहे. कायद्यातील सुधारणे मुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास दूरसंचार माहिती अन प्रसारण राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज 4/10/2020 रोजी वाशिम दौऱ्यावर असताना वाशिम विश्राम भवनातील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार राजेंद्र पाटणी. आमदार रणवीर सावरकर. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात . प्रदेशाध्यक्ष राजू पाटील राजे . जिल्हा परिषद सदस्य शाम बडे . हे उपस्थित होते.