*कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालकांच्या निधनाने अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सरसावले शासन अन् जिल्हा प्रशासन*
*दोन्ही पालक गमावलेल्या जिल्हयातील 19 बालकांना जिल्हा कृती दलामार्फत आर्थिक मदतीचे प्रस्ताव मंजूर*

*दोन्ही पालक गमावलेल्या जिल्हयातील 19 बालकांना जिल्हा कृती दलामार्फत आर्थिक मदतीचे प्रस्ताव मंजूर*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अलिबाग,जि.रायगड :- देशात पसरलेल्या कोविड-19 या रोगाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये बालकांची काळजी व संरक्षणाच्या संबंधित या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कोणीही पालक नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्हयामध्ये ओढली जाण्याची शक्यता असल्याने, अशा मुलांकरिता महिला व बाल विकास विभागाच्या दि. 07 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार कृतीदलाची बैठक आज (दि.02 सप्टेंबर) रोजी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदिप स्वामी, जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. अशोक भि. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कोल्हे, श्री.एन.जी.मंडलिक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ, एस.ओ.एस.बालग्राम, सोगाव चे संचालक श्री. राकेश सिन्हा, रायगड चाईल्ड लाईन चे समन्वयक अमोल जाधव, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती रोशनी ठाकूर यांची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा कृतीदलाचा कामकाज आढावा सादर केला. त्यांनी कोविड-19 मुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या-499, दोन पालक गमावलेल्या बालकांची संख्या-19, एकूण एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या-518, एकूण SIR झालेली संख्या-321, SIR अपलोड केलेली संख्या-321, बाल कल्याण समिती समोर किती बालकांना देण्यात आले-173, बाल संगोपन योजनेचे आदेश किती बालकांना देण्यात आले-76, किती बालकांचे ताब्यात आदेश देण्यात आले-170, किती बालकांचे अनुरक्षण सेवेचे आदेश देण्यात आले-0,शाळेच्या फीचे साक्षांकित प्रमाणपत्र व शाळेच्या बँक खात्याच्या माहितीसह आयुक्तालयास सादर करण्यात आले-73, किती बालकांचे बँक खाते उघडण्यात आले (5 लक्ष रुपयांच्या मुदत ठेवीकरिता)-19, अनाथ प्रमाणपत्रासाठी किती बालकांचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहेत-13, किती कोविड विधवा महिलांची माहिती घेण्यात आलेली आहे-226, किती कोविड विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला- या महिलांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले आहेत. जिल्ह्यातील एकूण बालगृहाची संख्या-7, एकूण एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या NCPCR संकेतस्थळावर अद्ययावत केल्याची संख्या-442, अशी माहिती उपस्थित समिती सदस्यांना दिली.
बैठकीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक निधन पावलेल्या बालकांची शोध मोहिम व त्यांना मदत देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु ठेवावे, एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
बालकांची मालमत्ता व आर्थिक हित अबाधित राहण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव श्री.स्वामी यांनी विशेष मार्गदर्शन व मदत केल्याबद्दल जिल्हा कृती दलाच्या वतीने जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील यांनी त्यांचे विशेष आभार मानले.