पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे रक्तदानाचा महायज्ञ शिबिर संपन्न,123 रक्तदात्यांनी केल रक्तदान

मुकेश शेंडे
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
9011851745.

सिंदेवाही दिनांक 03:- पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अरविंद पोलीस अधीक्षक चंद्रसाळवेपूर, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी, यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येणारी शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती, सार्वजनिक गणेश मंडळ, व्यापारी असोसिएशन समिती सिंदेवाही, पत्रकार बंधु व शहरातील युवावर्ग यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रक्त पेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने गणेश उत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे रक्तदानाचा महायज्ञ शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये सिंदेवाही तालुक्यातील युवा वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद देऊन एकूण 123 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.

सदर रक्तदानाचा महायज्ञ शिबिराला मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी, गणेश जगदाळे तहसीलदार सिंदेवाही, अरुण गौड वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही, अमोल बनसुरे व शशिकांत पेंढारकर तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही तसेच लोक प्रतिनिधी रमाकांत लोधे जि प सदस्य, नागराज गेडाम सभापती समाज कल्याण जि प चंद्रपूर, राहुल पोरेड्डीवार जि प सदस्य, तसेच सौ आशाताई गंडाटे अध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, स्वप्निल कावळे उपाध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही, सिंदेवाही तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू व भगिनी यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्याकरिता रक्तदानाच्या महायज्ञ शिबिराला भेट दिली.

तसेच सिंदेवाही स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रक्तपेढी चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय पथक यांनी रक्तदानाचा महायज्ञ शिबिर यशस्वी होण्याकरिता येतोचित्त परिश्रम घेतले. सिंदेवाही पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व सिंदेवाहीवासियांनी कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here