अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही व कृषी विभाग राजुरा च्या माध्यमातून गोवरीत महिला जनजागृती सभा

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा तालुका येथील शेतकरी मेडावा, सविस्तर वृत्त खलील प्रमाणे माहिती नुसार आज अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही व कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानातून मौजा गोवरी येथे महिला प्रशिक्षण सभेचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक वैशाली सोनटक्के मॅडम यांनी महिलानी बचत गटा मार्फत उद्योग करून सवयंपूर्ण कशे होईल व सेफ्टी किट याबाबत विस्तृत माहिती महिलांना दिली.
प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार यांनी पुरुषा प्रमाणे महिलांना पण शेतीविषयीक ज्ञान संग्रह असणे आवश्यक आहे, कीटक नाशक फवारणी, लेबल केल्म, अतिविषारी गटातील किटनाशके, खत व्यवस्थापन, शेतात काम करताना सुरक्षा चा अवलंब इत्यादी विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रक्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर यांनी महिला सक्षमीकरण याबाबत महिलांना संबोधित केले. सदर सभेसाठी दिलासाग्राम चे शैलजा मेश्राम, महिला ग्रामसंगाचे अध्यक्ष वर्षा विश्वास बोढे, सचिव बारूलाताई टेकाम कृषिमित्र धनंजय लोहे प्रक्षेत्र अधिकारी हेमराज साळवे व महिला बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.