मजूर मिळत नसल्याने मंगरुळपीर तालुक्यातील सोयाबीन कापणी चे दर वाढले अवाच्या सव्वा.
विनायक सुर्वे प्रातिनिधी
मंगरुळपीर:- गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त झाले. शेतात आलेला मला लवकर कर घरात आणावा या उद्देश . मंगरूळपीर तालुक्यातील सर्व खेडे परिसरात शेतकरी सोयाबीन कापणी घाई करीत आहे काय.
यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हार्वेस्टरने सोयाबीन कापणी अडचणी येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी सोयाबीन कापणी साठी मजुरांची शोधाशोध करीत आहे.
त्यात मजुरांनी सोयाबीन कापण्याचे भावी वाढविले आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील सर्वच खेडे परिसरात सोयाबीन कापणी सुरुवात झालेली आहे. यावर्षी अति पावसामुळे शेतात अजूनही जमीन पाण्याची वोल कायम आहे. त्याच्यामुळे दरवर्षी शेतकरी ज्या आधुनिक यंत्रणेतून जशी की हार्वेस्टर सोयाबीन कापणी करतो ते यावर्षी शक्य होताना दिसत नाही आहे. याच संधीचा फायदा घेत मजुरांनी देखील सोयाबीन कापणी चे दर वाढवले आहे.
मागील वर्षी सोयाबीन सोनी चे भाव 1800 ते 2000 पर्यंत होते . पण यावर्षी तेच भाव 2500 ते 3000 पर्यंत आहेत.
एवढा भाव दिल्यानंतर मजुरांना शेतात येण्या जाण्यासाठी स्वतंत्र वाहन देखील द्यावे लागतात आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक आपत्ती यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सोयाबीन कापणी चा भाव पुरेनासा झाला. तरीसुद्धा शेतात आलेला माला घरी आणण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. काही शेतकरी मजुरांना पुरेसी मजुरी देऊन सुद्धा मजूर कामास येण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे.