हाथरस येथील मनिषा वाल्मिकी बलात्कार प्रकणातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे- समता सैनिक दलाची मागणी

53

हाथरस येथील मनिषा वाल्मिकी बलात्कार प्रकणातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे- समता सैनिक दलाची मागणी

 राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविले जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन

वर्धा:- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मनिषा वाल्मीकी या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार,अत्याचार करून तीची जीभ कापून मानेची हड्डी तोडून केलेल्या मारहाणीत तीच्या मणक्याला गंभीर दु:खापत झाली व शेवटी दवाखान्यात तीचा करून अंत झाला. पोलिसांनी तीच्या परिवारास अंतिम संस्कार न करू देता, मुलीच्या कुटबीयांना त्यांच्या घरात डांबून ठेवून मध्यरात्रीनंतर परस्पर अंत्यसंस्कार उरकून म्रुतदेहाची विल्हेवाट लावली. भारतीय संस्कृतीला काळीमा फासणा-या या घटने विरोधात देशात आक्रोश निर्माण झाला आहे.या नराधमांच्या विरोधात समता सैनिक दलाच्या वतीने शहरात एकत्रित येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.बलात्कार, अत्याचार व खुन करणाऱ्या कु्रकर्मी नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मा.महामहिम राष्ट्रपती व मा. प्रधानमंत्री यांना जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून करण्यात आलेल्या विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने

१) या प्रकरणाची अँट्रोसीटी अँक्टनुसार कार्यवाही करण्यात यावी

२) या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी.

३) या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवावा.

४) पिडिताच्या परिवारास उत्तर प्रदेश सरकारने १ करोड रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे व परिवारातील सदस्यास नौकरी देण्यात यावी.

६) उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या काळात खुण,दहशत व बलात्काराचे प्रकरणे घडत आहेत. दलित व पिडितांवर राजरोसपणे अन्यायांच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे हे माफिया सरकार बरखास्त करण्यात यावे.

७) पिडितेच्या गावातील सवर्ण समाजाकडून मागास समाजास तुच्छतेची वागणूक देण्यात येते. त्यांचा छळ केल्या जातो. त्यामुळे गावातील मागास समाज सवर्ण समाजाला कायम भिऊन जगतो.सवर्ण समाजाची टवाळखोर, मस्तवाल पोर मागासवर्गीय मुलींची छेड काढणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार सर्रास करतात. या प्रकारच्या घटनांमध्ये काही राज्यात वाढ होत आहे. अशा घटनांवर केंद्र सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आदी मागण्या पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
तसेच उत्तर प्रदेशातील पोलीस पिडितांच्या परिवारासोबत गुंडागर्दी करीत आहे.महिला पत्रकारासोबत अमानुषपणे वर्तणूक व देशातील महिला, पुरुष नेते व कार्यकर्त्यांसोबत गैरवर्तणूक करीत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील सरकारचे पोलीस यंत्रणेवर लक्ष नाही किंवा षडयंत्र आहे असे आढळून येते. या क्रुत्याचा आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने सर्व भारतीय निषेध करीत आहोत.

यावेळी निवेदन देतांना समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे, ज्येष्ठ कार्यकर्ते मार्शल रमेश निमसडकर, जिल्हा महासचिव स्वप्नील कांबळे,मिलिंद मून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत, प्रा.धैर्यशील ताकसांडे. समता सैनिक दल जिल्हा सुरक्षा विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, मधुर येसनकर, एन.व्ही.मून,श्यामराव डहाके, गौतम देशभ्रतार, सुनील ढाले, मुकुंद नाखले, सुरेश भस्मे, प्रदीप वनकर,मधुकर थुल, आशिष तेलंग, रामदास करपाल,भगवान करपाल,सोनू नाईक, मुकुंद गाडगे, जिवन ताकसांडे, संजय डांगे, सुरज झामरे, विजय नगरकर, अनिल पेंदाम, शुभम बांगडे, प्रविण लोखंडे, सम्यक नगरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.