वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका यांचे मार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित.

✒गुणवंत कांबळे✒
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई:- वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका यांचे मार्फत दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी सायन कोळीवाडा प्रतिक्षांनगर जेतवन बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष अशोक इंगळे,तालुका कायदा सुव्यवस्था समिती अध्यक्ष अशोक शेळके, समाधान शिंदे आदी मान्यवर पदाधिकारी सायन रुग्णालय येथे सचिन बल्लाळ कम्युनिटी डेवलपमेंट ऑफिसर यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे नियोजित रक्तदान शिबिर आज संदर्भात निवेदन देण्यात आले.
त्यावेळी सुनिता गमंडी ताई, एम एस डब्ल्यू मेडिकल सोशल वर्कर व आदरणीय शुभम भोई, कम्युनिटी डेव्हलपमेंट, आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना वायरसची पार्श्वभूमी लक्षात घेता पडलेला रक्ताचा तुटवडा ही बाब लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भव्य रक्तदान शिबिर वंचित बहुजन आघाडी सायन तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचं रीतसर निवेदन सायन हॉस्पिटलला भेट देऊन त्यांना देण्यात आलं. तसेच विभागातील नागरीकांनी रक्तदान करण्यासाठी शिबिराला विषेश सहभाग घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवावी. असे सायन कोळीवाडा तालुका महासचिव विजय कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
,