“त्या” वसुलीबाज वाहतूक पोलिसावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हरिश्चंद्र अवचट यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !
कर्तव्यावर दारू पिऊन करतो अवैध वसुली संदीप रूडे नामक वाहतूक पोलिसावर अवैध वसुलीचे आरोप.

एम आय डी सी क्षेत्रातील टेंभरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला वाहतूक पोलिस हा अनेक दिवसांपासून अवैध वसुली करत असल्याने त्याचे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर हेतुपरस्पर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात आजवर शेकडो अपघात होऊन यात अनेकांचे बळी देखील गेले आहेत. या सर्व बाबींकरिता कर्तव्यावर असलेला हा वाहतूक पोलिसच जबाबदार असून त्याचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याने अवैधरित्या गोळा केलेल्या त्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे पत्र हिंगणा पंचायत समितीचे माजी उपसभापती हरीश्चंद्र अवचट यांनी थेट आता गृहमंत्र्यांकडेच दिले आहे.
हिंगणा पंचायत समितीचे उपसभापती अवचट यांनी राज्याचे गृहमंत्री यांना पाठविलेल्या पत्रानुसार बुटीबोरी एम आय डी सी हे आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असून या ठिकाणच्या गुन्हेगारी वृत्तीच्या घटनांवर अंकुश बसावा याकरिता परिसरातील टेंभरी या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्याची व्यवस्था करण्यात आली. याच पोलिस ठाण्यात वाहतूक नियंत्रणासाठी म्हणून संदीप रूडे नामक पोलिसाला नियुक्त करण्यात आले. मात्र ह्या वाहतूक पोलिसाने गेले अनेक दिवसांपासून अवैध वसुलीचा गोरखधंदा सुरू केलेला आहे. हा पोलीस कर्मचारी कर्तव्यावरच दारू पिऊन अवैध वसुली करीत असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या क्षेत्रात अनेक कारखाने असल्यामुळे त्या ठिकाणी कामास येण्यासाठी महिला व पुरुष कामगार हे मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या कामावर येत असतात. अशा वेळी हा पोलिस त्या वाहनांना हेरून कारवाईची भीती दाखवत त्या वाहनचालकांकडून मिळेल तेवढी वसुली करून मोकळा होतो.
शिवाय त्याने या ठिकाणाहून रहदारी करणाऱ्या अनेक वाहनांचे दर निश्चित केले असून आटो चालकांकडून महिन्याला 300 रुपये,अवैध रेती,गिट्टी,मरूम आदी जड वाहनधारकाकडून 2000 रुपये महिना असा फंडा वापरला आहे.या क्षेत्रात जवळपास 100 ऑटो तसेच अवैध वाहतुकीच्या जवळपास 300 वाहनांची रोज वाहतूक होत असते. यातून हा पोलीस महिन्याकाठी किती माया जमवत असेल याचा अंदाज बांधता येईल.त्यामुळे त्याच्या संपत्तीची देखील चौकशी करण्यात यावी असी मागणी अवचट यांनी पत्राद्वारे केली आहे. स्थानिक एम आय डी सी परिसरात अवैध पार्किंगचा बोलबाला राहत असून सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे या ठिकाणी शेकडो अपघात होऊन त्यात अनेकांचे बळी देखील गेले आहे.त्यामुळे या वसुलीमीजाज संदीप रूडे नामक वाहतूक पोलीसावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असी मागणी थेट आता गृहमंत्र्यांकडे अवचट यांनी केली असून संबधित पत्राची प्रत ही राज्याचे पोलिस महासंचालक तसेच नागपूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांना देखील दिली आहे.सदर पोलिसावर विभाग कोणती कार्यवाही करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संबधित तक्रारी संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौव्हान यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वाहतूक पोलीस संदीप रुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भेटून बोलून असे सांगितले.परंतु कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.