जिल्हा सामान्य रुग्णालयात पोषाहार सप्ताह निमित्त आहार प्रदर्शनाचे आयोजन

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अलिबाग,जि.रायगड :- दि.7 सप्टेंबर पर्यंत साजरा करण्यात येत असलेल्या “पोषाहार” सप्ताहानिमित्त जिल्हा रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील परिचर्या महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात “आहार प्रदर्शन” भरविले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते आज (दि.4 सप्टेंबर) रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती अनिता भोपी व परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती गायत्री म्हात्रे व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्ण व गरोदर माता, लाभार्थी यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आहारमूल्ये व पोषण याविषयीच्या माहितीचा लाभ घेतला.