*अमेझॉन कंपनीद्वारे ग्राहकाची फसवणूक, ऑनलाईन मोबाईल मागितला, अन् पाठविला भांडे घासण्याचा साबून*

✍अमोल थूल✍
मीडिया वार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी राळेगाव 9130494209
राळेगाव- सविस्तर वृत्त असे की, राळेगाव तालुक्यातील वडकी येथील रहिवासी कादर पठाण यांनी amezone कंपनी द्वारे ऑनलाईन redmi पॉवर 9 नवीन मोबाईल 13,499 रुपये किंमत असलेला बुकिंग केला, तसेच पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीला सर्व रक्कम देण्यात आली होती,
कादर पठाण यांना मोबाईल आपल्या मित्राकडे दाखवायला न्यायचा असल्यामुळे त्यांनी मित्राकडे जाऊन पार्सल काढले असता, त्या पार्सल मध्ये भांडी धुण्याचा विम बार साबणाची वडी दिसून आली, झालेला प्रकार पीडित ग्राहकाने पोलीस स्टेशन वडकी येथे जाऊन कळविले असता, वडकी पोलीस स्टेशन चे पी. आय. मा.विनायक जाधव साहेब आणि ए. एस. आय. मा.ओझा साहेब यांनी सदर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन अमेझॉन कंपनीचे मॅनेजर यांचेकडून पीडित ग्राहकास कंपनीकडून रक्कम परत करण्यास सांगितले, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व सहकार्यामुळे सामान्य व्यक्तीस न्याय मिळाला, अन्यथा हातून गेलेली रक्कम पुन्हा मिळण्याची शाश्वती नव्हतीच,
ऑनलाईन चे माध्यमातून अनेक ग्राहकांची व सामान्य जनतेची फसवणूक केली जात असून सामान्य जनतेनी कोणत्याही कंपनीच्या प्रलोभनास बळी पडू नये,
असे आव्हान वडकी पोलीस प्रशासनाने जनतेला केले आहे.