बामनवाड्याचा विकास हाच माझा ध्येय असे ठणकावून बोलणाऱ्या सरपंच्या भारती पाल दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव देणार काय? गावकऱ्यांमध्ये संभ्रम

66

बामनवाड्याचा विकास हाच माझा ध्येय असे ठणकावून बोलणाऱ्या सरपंच्या भारती पाल दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव देणार काय?

गावकऱ्यांमध्ये संभ्रम

 

बामनवाड्याचा विकास हाच माझा ध्येय असे ठणकावून बोलणाऱ्या सरपंच्या भारती पाल दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव देणार काय? गावकऱ्यांमध्ये संभ्रम
बामनवाड्याचा विकास हाच माझा ध्येय असे ठणकावून बोलणाऱ्या सरपंच्या भारती पाल दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव देणार काय?
गावकऱ्यांमध्ये संभ्रम

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे
राजुरा शहराला लागून असलेल्या बामणवाडा येथे नुकताच दारू भट्टी सुरू होणार असल्याची माहिती गावकऱ्यांमध्ये पसरली असून गावातील महिलांचा दारू भट्टी ला मात्र विरोध असल्याचे चित्र आहे.

बामणवाडा येथील सदन ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आलेल्या ग्रामपंचायतीला लाखों चा महसूल जमा होत असते असे असताना गावात दारू भट्टी सुरू होणार असल्याची माहिती गावात पसरली असल्याने अनेक नागरिक सरपंच्या भारती पाल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

मात्र काही नागरिक सरपंच्या भारती पाल यांच्यावर विश्वास ठवत त्या कर्तव्य दक्ष सरपंच्या असून स्वातंत्र्य दिनी त्यांनी बामणवाड्या चा विकास हाच माझा ध्येय असे भाषणातून शपथ घेतली असून दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव त्या कधीच होवू देणार नाही असे काही नागरिक बोलत आहेत. तर काही नागरिक शंका व्यक्त करीत बामणवाड्या चा विकास हाच माझा ध्येय म्हणणाऱ्या सरपंच्या भारती पाल दारू भट्टी सुरू करणे हाच विकासाचा ध्येय होता काय? असेही बोलत आहेत.

बामणवाडा येथे मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग असून दारू भट्टी सुरू झाल्यास महिलांना व शाळकरी मुला मुलींना प्रचंड त्रास होणार असून काही सजग नागरिक असे ठराव होवू नये अशी भूमिका घेतलेली आहे. प्रामाणिक व सदविवेक असलेले व पाच महिला पदाधिकारी ग्रामपंचायत मध्ये असल्याने बामणवाडा येथे दारुभट्टी सुरू होणार नसल्याचा विश्वास गावातील महिलांना आहे.