विदर्भाची ओळख होणार काय चित्रपटनगरी.? प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला.

56

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- विदर्भ अनेक कला आणि प्रतिभावंत कलाकाराने समृद्ध आहे. विदर्भात अनेक कलाकाराने भारत नाव कमवल आहे. पण दुर्दैव हे आहे की विदर्भात असा कलाकारांना कुठलाही प्लाटफॉर्म मिळाला नाही. त्यामूळे विदर्भातील कलावंतामध्ये प्रतिभा असुन ही हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे हे कलाकार कुठे तरी कमी पढत आहे.

आता अशा कलावंतासाठी विदर्भात चित्रपटनगरी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग आल्याचे समोर येत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा केली.

या भेटीनंतर ते महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, काँग्रेस नेते आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचीही भेट घेतली. राऊत आणि संजय दत्त यांनी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केल्याची माहिती आहे. संजय दत्त अचानक नागपूरला आला होता.

दरम्यान, नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी जाऊन जून महिन्यात संजय दत्तने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतली होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बरेच जुने आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. संजय दत्तने नागपूर दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी भेट घेतल्याने चित्रनगरीनगरी संदर्भात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

आता बघुया विदर्भाचे चित्रपट नगरी बनण्याचे स्वप्न पुर्ण होणार की नाही, हे लवकर समोर येणार. पण काही काय होये ना काही तरी हालचाल सुरु आहे हे महत्वाचे.