प्रेमीकेवर अत्याचार करून, प्रेमीकेला ठार करण्याचा प्रयत्न.

55

प्रेमीकेवर अत्याचार करून, प्रेमीकेला ठार करण्याचा प्रयत्न.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपूर: अत्याचार करून प्रेमीकेला ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज दिलीप चौधरी वय ३३, रा. घाटंजी, यवतमाळ,असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे.

बुटीबोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज दिलीप चौधरी आणी २२ वर्षीय तरुणी बुटीबोरी मधिल एका हॉटेलमध्ये काम करायचे. यादरम्यान त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. करोना वायरसच्या महामारीमुळे लॉकडाउन करण्यात आले, आणी सर्व हॉटेल बंद झाले. त्यानंतर तरुणीने पंकज याच्या मागे लग्नाचा तगादा लावला. ३१ जुलैला पंकज हा तरुणीला घेऊन बुटीबोरीतील पुलाखाली आला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने लग्नाची गळ घातली असता पंकज याने वायरने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून पंकज पसार झाला. काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. घरी गेली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी पंकज याच्याविरुद्ध अत्याचार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.बी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यवतमाळ येथून पंकज याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.