खापरी मोरेश्वर व खैरी खुर्द येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेन्द्र सिरसाट
9822917104
तालुक्यातील खापरी मोरेश्वर व खैरी खुर्द येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले. गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अशा भावना प्रवेश येणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. प्रवेश करणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य ज्योती कांबळे, फुलनबाई वानखेडे, माला नेवारे, कमला भंडारे, संध्या उईके, छाया आलाम, छाया इंगोले, बेबीबाई कांबळे, लिलाबाई उईके, शकुंतला मसराम, बहीणाबाई शेडमाके, चंद्रकला उईके, स्वप्निल कुंभारे, ग्यानीराम खंडाते, शिवम सावरकर, पंकज बुरांडे, तुषार सावरकर, चुडामण येस्कर, अतुल सावरकर, प्रशांत शेंडे आदींचा समावेश आहे.
तर प्रशांत शेंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या हिंगणा तालुका उपाध्यक्षपदी नीयुक्ती करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष पुंड, राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर प.स. सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, शहराध्यक्ष प्रेम सावरकर, उपासरपंच नरेश नरड, प्रमोद फुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.