सांगली येथील विज महावितरणच्या अभियंत्यासह चालकास लाच घेतल्या प्रकरणी अटक.

✒ संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
जालना:- जालना येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. जालना येथील महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंत्यांसह त्याच्या खाजगी वाहनचालकास वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कंत्राटदाराकडून 30 हजाराची लाच घेताना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. विज मंडळाचा एका मोठ्या अधिका-यावर लाच घेतल्या प्रकरणी ही कारवाई होऊन त्यांना अटक केल्यानंतर विज महावितरण मंडळाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्हातील विज महावितरण कार्यकारी अभियंता रेवानंद लक्ष्मण मोरे आणि खासगी वाहनचालक दीपक रतन नाडे अशी लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हा सौर उर्जेवर चालणा-या सोलर पॅनल बसवून देण्याचा काम करतात. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला जास्त बिल आले होते. या बिलाची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सापळा रचला.
तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मोरे यांच्याकडे पाठविण्यात आले. मोरे याने लाचेची रक्कम त्याचा खासगी वाहनचालक दीपक नाडे याच्याकडे देण्यास सांगितले. मोरे याच्या सांगण्यावरून नाडेने तक्रारदार यांच्याकडून लाचेचे 30 हजार रुपये स्वीकारले. साध्या वेशातील दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर मोरे यासही ताब्यात घेतले. याप्रकरणी जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.