*राष्ट्रवादी महीला कॉग्रेस एटापल्ली तर्फे शिक्षक दिन तथा आदर्श शिक्षक सत्कार…*

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं ९४०५७२०५९३
राष्ट्रवादी महीला काॅग्रेस पार्टी, तालुका शाखा एटापल्ली च्या वतीने दि. 08/09/2021 रोजी शिक्षक दिन तथा आदर्श शिक्षकांचा सत्कारा करण्यात आले… प्रदेशाध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशावरून व तसेच माजी जिल्हापरषद अध्यक्षा भाग्यश्री ताई ऋतुराज हलगेकर व तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्षा शाहीनभाभी हकीम यांच्या सुचनेनुसार एटापल्ली राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा सौ.ललिताताई मडावी व शहराध्यक्षा सौ.पोर्णिमा श्रीरामवार यांच्या नेतृत्वात एटापल्ली स्थित राजीव गांधी हायस्कुल येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री देवानंद बुध्दावार, मुख्याध्यापक (उ.श्रे.) पं.स. एटापल्ली, राजेश बारई, माध्य.शिक्षक राजीव गांधी हायस्कुल, एटापल्ली, सौ. वंदना उपगंनलावार, माध्य. शिक्षिका राणी राजमाता कन्या विद्यालय, एटापल्ली, व कु. गिता घसगंटीवार, पदविधर शिक्षिका, रा.रा. उच्च प्राथ. शाळा एटापल्ली इ. शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून शिक्षक दिनानिमित्त सन्मानीत करण्यात आले… कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष ललिता मडावी व पदाधिकारी यांच्या हस्ते डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे जेष्ठ शिक्षक श्रीकांत कोकुलवार यांनी केले… व सर्व मान्यवरांनी डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षण तथा शिक्षक यांच्या जीवनावर प्रकाश टाकले….
या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका अध्यक्षा ललिता मडावी, शहराध्यक्षा पोर्णिमा श्रीरामवार, युवती ता.अध्यक्षा तथा माजी पं.स. सभापती बेबीताई लेकामी, विद्यमान पं.स. सभापती बबिता गावडे, महिला आघाडी प्रमुख नलिनीताई अतकमवार, जि.प. सदस्या ग्यानकुमारी कौशी, सरिता गावडे, पुजाताई गहिरवार, बेबीताई हेडो, सुषमा गड्डमवार, अनिता कांबडे, भावना, सुनिता कांबडे, अक्षता पर्वतालवार, सुरेखा गड्डमवार, श्रीमती रामबाई संतोषवार इ. पदाधिकारी व सदस्या उपस्थित होते… तसेच शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. संचलन चनकापूरे सर तर आभार शेख सर यांनी केले…..