सूनबाईने वर्धा जिल्हाच्या बिजेपी खासदाराच्या परीवाराला दिला दणका, मुलाने केल लग्न.

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
वर्धा, 08 सप्टेंबर:- वर्धा जिल्हाचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने खासदाराच्या परिवारावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरुध्द नागपुर येथील पोलीस आयुक्ताकडे तक्रार दिली होती. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सर्वीकडे कडुन या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येत होता.
वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस यांच्या मुलगा पंकज तडस यांने अखेर पूजासोबत लग्न करुन या पारिवारीक नाट्यमय घडामोडीचा अखेर अंत केला. आज पुजा आणि पंकजचा लग्न सोहळा संपन्न झाला आहे. त्यांच्या लग्नाची नगर पालिकेत नोंदणी सुद्धा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी वर्ध्याचे खासदार रामदास तडस व मुलगा पंकज आणि परीवारावर सून पुजाने फार गंभीर आरोप करत जीवाला धोका असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियाच्या मध्यमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर याची मदत साठी विनंती केली होती. यात पूजाने आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आज नाट्यमय घडामोडींना अंत झाला. लग्न झाल्यानंतर आता पूजानं आपली सासरच्या विरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलं आहे.
तर पुजाचा नवरा पंकज तडस म्हणाले की, माझ आणि पुजाच लग्न हे 6 ऑक्टोबर रोजी झालं होतं. त्यावेळी सुद्धा आम्ही नियमानुसार नोटरी केली होती. पण, खासदार असलेल्या वडिलांनी मला संपत्तीतून बेदखल केलं होतं. त्यामुळे संसार थाटण्यासाठी अडचणी येत होत्या. माझे वडील खासदार असल्यामुळे त्यांची बदनामी करण्याच्या ऊद्देशाने सुपारी घेऊन आरोप केले गेले. पण, मी कालही लग्नासाठी ठाम होतो आणि आजही आहे.