महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू . 9 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजे पर्यंतच्या चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव निमित्त कलम 36 लागू

48

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

. 9 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजे पर्यंतच्या

चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव निमित्त कलम 36 लागू

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

सविस्तर वृत्त खलील प्रमाने अहे की चंद्रपूर: जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2021 पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 9 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

हे आहेत अधिकार:

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकान चे नियम लागु करण्यात आले आहे