नागपूर येथील मेयो रुग्णालयाच्या महिला सुरक्षारक्षक शरीरसुखाची मागणी; मेयो रुग्णालयातील धक्कादायक प्रकार.

51

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- नागपुर मधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नागपूर मधील प्रसिद्ध मेयो रुग्णालयातील महिला सुरक्षारक्षका कडे येथीलच पर्यवेक्षकाचे पदावर काम करणा-या व्यक्तीने शरीरसुखाची मागणी केल्याने नागपुर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. मेयो येथील पर्यवेक्षक राजू विठ्ठल पाटील वय 45 वर्ष असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ती 28 वर्षीय महिला ही नागपुर येथील मेयो रुग्णालयात सुरक्षारक्षक पदावर कार्यरत आहे. तिला सुटी देण्यासाठी राजु पाटील हा शरीरसुखाची मागणी करायचा आणि तिला त्रास द्यायचा.

आरोपी राजु पाटील याने 5 सप्टेंबरला सुरक्षा रक्षक महिलेची छेड काढली. पिढीत महिलेने याबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिने तहसील पोलीस स्टेशन मध्ये आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची तक्रार दिली. पोलिसांनी महिलेसह अन्य महिला जवानांची चौकशी केली. त्यानंतर विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी ऑट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राजू पाटीलला अटक केली.

पाटीलच्या वर्तणुकीमुळे मेयोत तैनात अन्य महिला जवानही त्रस्त असल्याचे पुढे आले. पीडित महिलेने जानेवारीतही पाटीलविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पाटीलची बदली करण्यात आली. परंतु, त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी मेयोतील एका डॉक्टरनेही प्रयत्न केल्याची माहिती आहे.