वर्धा जिल्ह्यात उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन

50

वर्धा जिल्ह्यात उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन

वर्धा जिल्ह्यात उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन
वर्धा जिल्ह्यात उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

वर्धा/हिंगणघाट:-  गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा विविध जयघोषात आज बाप्पाचे गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे घराघरात आगमन झाले. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा केली. पारंपारिक वाद्यांसह वेशभूषेचा साज यंदा गणेशोत्सवात दिसून आला.

पहाटेपासूनच तरुण मंडळाची ‘श्रीं’च्या मूर्ती प्रतिष्ठापनेची धांदल सुरू झाली. सायंकाळपर्यंत घरगुती गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापना केली जात होती. शहरातील मंडळांनी साधेपणाने प्रतिष्ठापना केल्याने याही वर्षी सजविलेल्या वाहनातून गणरायाचे स्वागत झाले नाही. पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह होता. शहरातील ठिकाणी गणेश मूर्ती नेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. शहरात आज गणेशाच्या पूजेसाठी स्वागताच्या साहित्य खरेदीसाठी लाखो रुपयांची उलाढाल झाली.

गत अनेक दशकात देशात सर्वधर्मीय सण व उत्सव साजरे करताना मोठ्या प्रमाणात शासन व प्रशासनाद्वारे अटी, शर्ती तसेच आदेश काढण्यात आले नाहीत. मात्र यंदा संपूर्ण जगासाठी महामारी ठरलेल्या कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व खबरदारी म्हणून सण व उत्सव साजरे करण्यासाठी काही प्रतिबंधित आदेश निर्गमित केले. त्याचे नागरिकांनीही आजवर पालन करताना गणेशोत्सोत्सवात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यंदा जिल्ह्यातील गणेशभक्तांनी यंदा जिल्ह्यातील संकल्पना राबवित श्री मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तर जिल्ह्यात ठिकाणी सार्वजनिक व घरांत गणपती मूर्तींची स्थापना करण्यात आली.