बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड विभागातर्फे ग्राहक संपर्क कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम संपन्न.

66

बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड विभागातर्फे ग्राहक संपर्क कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम संपन्न.

बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड विभागातर्फे ग्राहक संपर्क कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम संपन्न.
बँक ऑफ इंडियाच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड विभागातर्फे ग्राहक संपर्क कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम संपन्न.

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यू-8208166961

अलिबाग, जि.रायगड,दि.10 (जिमाका):- बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय आणि अलिबाग तालुक्यातील शाखा यांच्या वतीने बँकेच्या 116 व्या वर्धापनदिनानिमित्त “नाते बँकिंग पलिकडचे” या ब्रीदवाक्यानुसार ग्राहक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन सुरुची गार्डन रिसोर्ट, कुरुळ येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास राष्ट्रीय बँकिंग समूह मुंबई विभागाचे ब्रिज लाल, महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोर चे पदाधिकारी, डॉक्टर्स, फार्मास्युटिकल व्यावसायिक, सूक्ष्म व लघु व्यावसायिक, सनदी लेखापाल आणि इतर ग्राहक वर्ग तसेच बँकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गही उपस्थित होते.

या कार्यक्रमात बँकेच्या विविध कर्ज योजना, ठेव योजना यांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर संजीवनी, डॉक्टर प्लस, स्टार व्यापार, स्टार उद्यमी, पीएसबी 59, गृह कर्ज, वाहनकर्ज, शैक्षणिक कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, कृषी पर्यटनसाठी कर्ज योजना याबद्दल माहिती विपनन विभागातर्फे देण्यात आली. त्याचबरोबर बँकेच्या विविध ठेव योजना, भारत सरकारच्या प्रधानमंत्री बीमा योजना, जीवन ज्योती बीमा योजना याबाबतही विस्तृत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँक ऑफ इंडिया, रायगड विभाग प्रमुख शम्पा बिस्वास यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना बँकेसाठी ग्राहक हे दैवत असून रायगड मध्ये बँक ऑफ इंडियाने केलेल्या व्यवसायामध्ये ग्राहकाकडून मिळत असलेले प्रेम अधोरेखित केले. त्याचबरोबर हा विश्वास असाच वृद्धिंगत होईल, असे आश्वासन उपस्थिताना दिले. त्याचबरोबर त्यांनी रायगड जिल्ह्यातील बँकेच्या वाटचालीबद्दलही माहिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान ग्राहकांबरोबर झालेल्या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन महाप्रबंधक ब्रिजलाल यांनी केले. त्यांनी यावेळी बँक ऑफ इंडिया चे बँकिंग क्षेत्रामधील योगदान, बँकेची प्रगती, बँकेचे विविध उपक्रम, याविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच आपली व्यावसायिक स्वप्ने बँक ऑफ इंडिया साकार करेल, यासाठी बँकेबरोबर संबंध अधिक सुदृढ करावेत, असे आवाहन उपस्थितना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंतकुमार यांनी केले. त्याचबरोबर उपस्थित ग्राहकांचे आभार उप आंचलिक व्यवस्थापक रमन पारकर यांनी मानले.
बँकेच्या 116 व्या वर्धापन दिनानिमित्त स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड या प्रशिक्षण केंद्राच्या नियोजित ठिकाणी महाप्रबंधक ब्रिजलाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बांधन येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमास बँकेच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत चादर, ब्लँकेट, गादी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय कार्यालयातील अधिकारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.