बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण.
लाईटच्या महत्वपूर्ण मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल नगरपालिकेचे धन्यवाद – आशिष देवतळे

✍ निखिल पिदूरकर ✍
कोरपणा तालुका प्रतिनिधी
📲9067769906📲
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड मध्ये मुख्य मार्गावरील चौकात लाईट कमी असल्यामुळे अंधारमय मार्गातून लोकांना ये-जा करावे लागत होते या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आशिष देवतळे यांनी नगर परिषद बल्लारपूर मध्ये निवेदन सादर केले व सातत्याने पाठपुरावा केला आणि या महत्वपूर्ण मागणीकडे लक्ष देत नगराध्यक्ष हरिषजी शर्मा यांनी पुढाकार घेऊन आज गणपती वार्ड मध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण केले.
याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजपा कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहर अध्यक्ष काशी सिंग, मनिशजी पांडे, गोपाल अण्णा रेड्डी, आनंदरावजी कटारे, नारायणरावजी खनके, तुकारामजी लोढे, सुजित निर्मल, शालिक डंभारे, नवराजजी परसुटकर, दिनेश राखुंडे,विनोद लोणकर, गणेश लोढे, संजय तूमाने, विवेक कोल्हे यांसह गुलशन शर्मा, मिथिलेश पाण्डे, मनीष रमिला, कैलाश गुप्ता, श्रीकांत उपाध्याय, अशोक सोनकर, श्रवण मोगरम त्याच बरोबर वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला व हाय मास्ट लाईट जनतेच्या सेवेकरिता सुरू करून देण्यात आले.