मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.

46

मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.

मोरगावचा श्री मयूरेश्वर गणपती

मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.
मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.

मोरगाव:- महाराष्ट्र राज्यातील पवित्र अशा अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा श्री मयूरेश्वर ओळखला जातो. याच्या प्रथम दर्शनाने आपण अगदी टवटवीट झाल्या सारख होतो. महाराष्ट्राच्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यापासून अवघा 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला ‘भूस्वनंदा’ या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे.

कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. पवित्र अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.

मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.
मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.

श्री मोरेश्वराची गणपती कथा…!
पुरातन आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले.

मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.
मीडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज मोरगावचा श्री मयूरेश्वरचा महिमा.

श्री मोरेश्वराचे मंदिर…!
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.