शेकडो एकर शेती पाण्याखाली वर्धा नदी तूडूंब नदिकाठावरील गावांना प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- गेल्या काही दिवसांपासून सततधार सुरू असलेल्या पावसाने वर्धा नदी तूडूंब भरुन वाहत आहे त्यामुळे नदिकाठावरील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेली आहे नदिकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे वर्धा नदी तूंब भरून वाहत आहे त्यामुळे नदिकाठावरील शेकडो एकर शेती सद्यस्थितीत पाण्याखाली आली आहे त्यामुळे ..धान.. सोयाबीन .. कापूस ..या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे अनेक गावाशेजारी पाणी आलेले आहे पाण्याचा वाढता वेग पहाता तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्याला जोडणारा पोडसा फूल लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे .. आर्वी येथील वर्धा नदी वरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प आहे प्रशासनाने नदिकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे