अवैध दारू व्यवसायांविरुद्ध जागजाई येथील ग्रामस्थांचा एल्गार, दारूबंदी साठी राळेगाव पोलीस स्टेशनला महिलांनी दिले निवेदन

58

अवैध दारू व्यवसायांविरुद्ध जागजाई येथील ग्रामस्थांचा एल्गार, दारूबंदी साठी राळेगाव पोलीस स्टेशनला महिलांनी दिले निवेदन

गावातील दारूबंदी व्हावी म्हणून एका महिलेने तर केले चक्क विष प्राशन

अवैध दारू व्यवसायांविरुद्ध जागजाई येथील ग्रामस्थांचा एल्गार, दारूबंदी साठी राळेगाव पोलीस स्टेशनला महिलांनी दिले निवेदन
अवैध दारू व्यवसायांविरुद्ध जागजाई येथील ग्रामस्थांचा एल्गार, दारूबंदी साठी राळेगाव पोलीस स्टेशनला महिलांनी दिले निवेदन

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836

राळेगाव : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, जागजाई गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. अवैध दारूविक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी गावातील सार्वजनिक परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी गावात परिसरात ठाण मांडून असतात. दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत राळेगाव पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली. गावातील एका महिलेने दारूच्या वाढत्या प्रकारामुळे विष प्राशन केल्याचीही चर्चा आहे.

राळेगाव तालुक्यातील जागजाई गावात अवैध व्यवसायांचा बोलबाला असून, यावर पायबंद घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील दारू विक्रीसह अन्य अवैध व्यवसायांवर पायबंद घालावा, अशी मागणी जागजाई ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. जागजई गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगले डोके वर काढले आहे. अवैध दारूविक्रीसह व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. मध्य प्रेमी दारूची यावेळी करण्यात आली.