युवा स्वाभिमान पक्षा मध्ये तरुण- तरूणींचा, महिला व पुरुषांचा जिल्ह्यात धडाडीने प्रवेश सुरु

✒निखिल पिदूरकर ✒
कोरपणा तालुका प्रतिनिधी
9067769906
गडचांदूर:- युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.सूरजभाऊ ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे विविध पक्षातील बरेच युवक, महिला व कामगारांचा युवा स्वाभिमान पक्षात जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला… व त्याचबरोबर गडचांदूर येथील नागरिकांनी विविध समस्या जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगितल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी तेथील नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यावश्यक सेवा पासून वंचित असलेल्या नागरिकांन बाबत सुरज ठाकरे यांनी चिंता व्यक्त करून प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून थेट फेसबूक लाईव्ह घेऊन गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता व प्रशासनाने समस्या मार्गी लावण्याकरिता फेसबुक लाईव्ह द्वारे विनंती देखील केली. व येथील नागरिकांच्या पाणी, रस्ते, वीज अशा प्रकारच्या इतरही समस्या लवकरच मार्गी लावणार असे आश्वासन यावेळेस जिल्हाध्यक्ष यांनी नागरिकांना यावेळेस दिले. व आज दिनांक 11 सप्टेंबर ला श्री. आशिष आगरकर, शहर अध्यक्ष गडचंदुर यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी निखिल बजाईत, राहुल चौहान, अजावान टाक आदी पदाधिकारी उपस्थित होते.