हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पेटलेल्या रुग्णवाहिकेतून येतोय घातपाताचा वास

✒️आशीष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वडनेर:- हिंगणघाट तालुक्यात श्री गणेशाचे सर्वत्र जल्लोषात स्थापना होत असतानाच दुसरीकडे वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयवर सलग दोन दिवस विघ्नं आले. वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आदल्या दिवशी रुग्णालयात धुमाकूळ घालून तोडफोडीच्या प्रकार. तर दुसरे दिवशी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी केलेली पोलीस तक्रार काही राजकीय धेंड पुढाऱ्याच्या इशाऱ्यावरून मागे घेणे आणि काही तासानंतर रुग्णालयाच्या आवारात उभी असलेली रुग्णवाहिका अचानक पेटणे. या आलेल्या विघ्नाबाबत एकच खळबळ माजली असून या पेटलेल्या रुग्णवाहिकेतून घातपाताचा वास सर्वत्र पसरलेला आहे.
शासनाने सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सन् १९८२ साली वर्धा जिल्ह्यात प्रथमच हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे एकमेव ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली होती. परंतु, आज शासनाच्या दुर्लक्षामुळे याच रुग्णालयाला अनंत समस्यांचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी वर्धा जिल्ह्याचे राजकारण वडनेर गावातून चालत होते हां नावलौकिक वडनेर गावाला मिळाला. जिल्ह्यात प्रथम ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती वडनेर या गावात झाली.परंतु, आज याच वडनेर गावात राजकीय धेंड पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवकळा आलेली आहे. केवळ वारसा चालावा म्हणून मुखावर आच्छादन काहींनी घातले तर काही पुढारी मताच्या राजकारणासाठी मुखावर पांघरून घालून ग्रामीण जनतेच्या आरोग्य विषयक सोयीसाठी आम्ही झटत असल्याचा आव आणत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र, आज या रुग्णालयाची अवस्था घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.