चंद्रपूर जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नती

55

चंद्रपूर जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नती

सहा उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणा-या ६ सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नतीने स्थानांतरण.

जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नती
जिल्ह्यातील 6 सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नती

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील सहा उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणा-या ६ सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे पदोन्नतीने स्थानांतरण केले आहे. त्यानुसार मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांची गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अपर पोलीस आधिक्षक पदावर तर चिमुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सिंधुदुर्ग येथे अपर पोलीस अधिक्षक पदावर पदोन्नतीने स्थानांतरण केले आहे. जिल्ह्यातील या दोन वरीष्ठ पोलीस अधिका-यांशिवाय राज्यातील चार सहाय्यक पोलीस अधिक्षकांची पदोन्नतीने स्थानांतरण केले आहे. त्यामध्ये पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांची लातुर, पैठण येथील गोरख भामरे यांची वाशिम, पुणे ग्रामीण येथील नवनित काँवर यांची उस्मानाबाद आणि श्रवण दल यांची लोनावळा येथुन बुलढाणा येथे अपर पोलीस अधिक्षक पदावर पदोन्नती केली