मुंबईच्या काशीनाथ बारामते याच्या घरात गणपती बाप्पाच आगमन

43

मुंबईच्या काशीनाथ बारामते याच्या घरात गणपती बाप्पाच आगमन

मुंबईच्या काशीनाथ बारामते याच्या घरात गणपती बाप्पाच आगमन
मुंबईच्या काशीनाथ बारामते याच्या घरात गणपती बाप्पाच आगमन

काशीनाथ बारामते, 9222166358
मुंबई:- गणरायासाठी रात्रीचा दिवस करून आपण सजावट करत असतो. मुंबईत काशीनाथ बारामते कुटुबांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यातली कल्पक सजावट लक्ष वेधून घेते. पर्यावरण पुरक अशावर आधारित केलेली सजावट लक्षवेधी ठरली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. बारामते परीवार गणेशोत्सवासाठी तयारी करण्यात सहभागी व्हायचे. आपणही आपल्या घरी गणपती आणला तर, अशी कल्पना त्यांच्या मनात डोकावली आणि मग त्यांच्या घरी गणेशोत्सव सुरू झाला. तयार साहित्य आणून बाप्पाची आरास करण्याऐवजी, प्रत्येक वर्षी एखादी संकल्पना घेऊन, त्याला अनुसरून सजावट करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि प्रत्येक वर्षी पर्यावरण पुरक आरास तयार करत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या या धामधुमीबद्दल बोलताना काशीनाथ बारामते सांगतात की, ‘गणेशोत्सवाची आरास, नैवेद्याची तयारी, प्रत्यक्ष बाप्पाचं आगमन, आरत्या, येणारे पाहुणे, विसर्जन या सगळ्यामुळे आपण आपल्या मराठमोळ्या संस्कृतीशी अजूनही जोडलेले आहोत याची जाणीव होत राहते. ही सगळी तयारी करताना मिळणारा आनंद वर्षभर पुरतो. बाप्पाचं रूपच इतकं मनमोहक आहे, की प्रसन्न वाटल्याखेरीज राहत नाही. तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं, दरवर्षी नवीन संकल्पनेचा विचार करून देखाव्याच्या माध्यमातून ती साकारणं आणि आप्तेष्टांना बोलावून तो दाखवणं हे सगळंच आनंददायी आहे. आपण आपली संस्कृती आपण जिवंत ठेवू शकतो हे यातून दिसून येतं.’