*तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ महाराष्ट्रात ; पोडसा गावात थाटली दुकाने ;म्हणे शासनाने परवाना दिला*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी: -स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ मग ते कुठल्याही राज्यातील असो त्याची विक्री करणे गुन्हा आहे.असे असतांना गोंडपिपरी तालुक्यातील सिमेवर असलेल्या पोडसा गावात खुलेआम खरेदी केली जात आहे. तेलंगणा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तांदुळ येथे विक्रीला आणले जाते.दर आठवड्यात सहा ते आठ ट्रक तांदळाची तस्करी पोडस्यातून होत असल्याची माहीती आहे.गावात चार ते पाच दुकाने थाटल्या गेली आहे.राजूरा तालुक्यातील व्यक्तीही येथे ठाण मांडून बसला आहे.आम्हचाकडे रीतसर परवाना असल्याचे हे तस्कर सांगतात.स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ खरेदी करण्याचा परवाना कुणी दिला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गरीब कुटूंबाना अल्पदरात शासन धान्य पुरवठा करीत असते. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे हे धान्य अनेक गरीब कुटूंबाना जगण्याचे आधार ठरले आहे.मात्र या तांदळावर डोळा ठेवून याची तस्करी करण्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यात सूरू आहे. सिमावर्तीत भागात असलेल्या पोडसा गावात हा व्यवसाय फोफावला आहे.तेलंगणा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावातून स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ लाभार्थ्याकडून अल्प दरात घेतले जाते.यासाठी तालुक्यातील शेकडो तरूण दुचाकीने गावोगावाची भटकंती करतात.लाभार्थ्यांचे घर गाठून अल्प दरात तांदुळ घेतल्या जाते.हा तांदुळ पोडसा येथे असलेल्या दुकानात विकल्या जातो.पोडसा येथे तिन ते चार दुकानात तांदुळ खरेदी केल्या जाते.खरेदी करणारे राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने या तस्करीकडे कानाडोळा प्रशासन करीत आहे. पोडसा येथिल स्थानिक या व्यवसायात गुंतले असतांनाच राजूरा तालुक्यातील काही व्यापार्यांनी येथे ठाण मांडला आहे.आम्हचाकडे रीतसर परवाना असल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात येते.काही दुकानात परवाण्याची छायाकिंत प्रत लटकवीली आहे.मात्र हा परवाना धान्य खरेदीचा आहे.स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ घेण्याचा नाही.दरम्यान महसूल विभागाने या दुकानाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी पुढे येत आहे.
तेलंगणा सरकारचे जागते रहो
तेलंगणातून होणारी तांदळाची तस्करी रोखण्यासाठी तेलंगणा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या.तेलंगणा-पोडसा मार्गही खोदला गेला.वर्षभर चौकी लावल्या गेली.मात्र तस्करी सूरूच आहे.
दुकानदाराचेच दुकान…
पोडसा गावात तांदुळ खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना आहे.त्या परवाना असलेल्या दुकानातील तांदुळाची तस्करी केल्या जात असावी,अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.