अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत नुकसान भरपाई द्या* *सोबतच उन्हाळी धानाचे उर्वरित बोनस वितरीत करा* *भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांची आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे पञाद्वारे मागणी*

53

*अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत नुकसान भरपाई द्या*

*सोबतच उन्हाळी धानाचे उर्वरित बोनस वितरीत करा*

*भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांची आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे पञाद्वारे मागणी*

अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत नुकसान भरपाई द्या* *सोबतच उन्हाळी धानाचे उर्वरित बोनस वितरीत करा* *भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांची आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे पञाद्वारे मागणी*
अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत नुकसान भरपाई द्या*
*सोबतच उन्हाळी धानाचे उर्वरित बोनस वितरीत करा*
*भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांची आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे पञाद्वारे मागणी*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर :-सविस्तर वृत्त खलील
प्रमाणे आहे शेतकरी कुटूंबियाचे
महापुरामुळे झालेल्या हानीचे
त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांच्या
कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची
मागणी भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.

याबाबतचे पञ आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले.

महाराष्ट्र व प्रामुख्याने विदर्भात सर्वञ गत ७ ते ८ दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे नद्या,नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला.पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठची शेती वाहून गेली.हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने सोयाबीन, मूग, उडीद,मिरची,कापूस यांसारख्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.शेतक-यांसमोर अतिवृष्टीचे नवे संकट निर्माण होऊन शेतकरी हतबल झाला आहे.

तरी प्रशासनानी महापुरात झालेल्या हानीचे पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी.सोबतच उन्हाळी धानाचे उर्वरित बोनस देखील वितरीत करावी,अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.