भोंदूबाबा 'मनोहरमामा' कडुन फसवणुक पोलिसांनी ठोकल्या बेडया, मिळाली पाच दिवसाची पोलिस कोठडी
भोंदूबाबा 'मनोहरमामा' कडुन फसवणुक पोलिसांनी ठोकल्या बेडया, मिळाली पाच दिवसाची पोलिस कोठडी

भोंदूबाबा ‘मनोहरमामा’ कडुन फसवणुक पोलिसांनी ठोकल्या बेडया, मिळाली पाच दिवसाची पोलिस कोठडी

भोंदूबाबा 'मनोहरमामा' कडुन फसवणुक पोलिसांनी ठोकल्या बेडया, मिळाली पाच दिवसाची पोलिस कोठडी
भोंदूबाबा ‘मनोहरमामा’ कडुन फसवणुक पोलिसांनी ठोकल्या बेडया, मिळाली पाच दिवसाची पोलिस कोठडी

✒ प्रवीण वाघमारे ✒
सोलापुर जिल्हा प्रतिनिधी
9923456641

सोलापूर :- सोलापूर जिल्हातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कॅन्सरवर खात्रीशीर उपचार करतो असे सांगून काही लोकांची फसवणूक झाल्याच्या घटनेने सोलापुर जिल्हा हादळला आहे. या प्रकरणी एका भोंदूबाबा मनोहरमामा तथा मनोहर भोसले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी ही कोठडी सुनावली.

बारामती शहरातील कसबा येथील राहत असलेल्या शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता. आपण संत बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले यांनी कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने 2 लाख 51 हजार रुपये घेतले. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहरमामासह ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे यांच्यावर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनोहरमामाचा शोध सुरु केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकानेही मनोहरमामावर पाळत ठेवली होती. शुक्रवारी दुपारी मनोहरमामाला सातारा जिल्ह्यातील लोणंदनजीकच्या सालपे येथील एका फार्म हाऊसवरुन ताब्यात घेत अटक करण्यात आली.

भोंदूबाबा मनोहरमामाला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. मनोहरमामा विरोधात करमाळा पोलिस ठायात ही महिला भक्तावर अत्याचाराचा गुहा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here