बिटरगाव पोलीस निरीक्षक श्री प्रताप भोस व उपनिरीक्षक श्री कपिल मस्के यांचा सत्कार.
ढाणकी पोलीस चौकी येथे बिटरगाव पोलीस स्टेशन कर्मचारी व सावळेश्वर गावकरी यांच्या संयुक्तिक विद्यमानाने वृक्ष रोपण.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 9309747836
ढाकणी : – बिटरगाव पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक नियुक्त श्री प्रताप भोस साहेब व पोलीस उपनिरीक्षक नियुक्त श्री कपिल मस्के साहेब कार्य रुजू झाले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन हे पैनगंगा अभयारण्य आणि बंदी भाग, सहस्त्रकुंड पर्यटक आणि पर्यटन स्थळ, नैसर्गिक जलसंपदा, वृक्षसंपदा, सहस्त्र जलधारा, आयुर्वेदिक वृक्षांच्या विविधतेने, विपुलतेने, हिरवा शालू पांघरलेला परिसर म्हणून ख्याती आहे. बिटरगाव वन विभागांतर्गत आणि पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अधिकारात भरपूर वनसंपदा, जंगल, नैसर्गिक संपत्ती आहे, त्यास पूरक म्हणून आज हा सावळेश्वर व आम्ही पोलिस कर्मचारी वृक्षरोपण करत आहे,ह्यावृक्ष लागवडीतून माझ्या कार्यक्षेत्र अधिकारात वसलेल्या वृक्ष संपदेचे रक्षण व्हावे हाच संदेश दिला.
आपल्या बिटरगाव पोलीस स्टेशन अभय अरण्य अंतर्गत, निसर्ग साकारल्याचा साक्षात्कार होतो.सर्वसामान्य माणूस निसर्गाप्रती कृतज्ञभाव युक्त राहावे, सद्य परिस्थिती वर्तमानकाळात मनुष्य स्वयंस्वार्थासाठी निसर्गाचा ऱ्हास करीत आहे. निसर्गाचे बिघडलेले संतुलन एका रात्रीतून ठिक होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाने निसर्गाप्रती सजग राहून निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे हाच संदेश या वृक्ष रोपण कार्यातून प्राप्त होतो. यासाठी माणसाने आयुष्यात एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे. कारण बदलत जाणाऱ्या जागतिक तापमानाचे दूरगामी परिणाम निसर्गावर व पर्यायाने मानवावर होत आहेत. उद्या परिस्थिती याहूनही भीषण असू शकते. म्हणूनच या समस्येवर “वृक्ष वाचवा निसर्ग वाचवा” या शिवाय पर्याय नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा हिरवळ नष्ट होत आहे. यासाठीच गावातील नागरिकांनी वृक्षसंवर्धन, संगोपन, लागवड या मध्ये सहभाग नोंदवावा व वृक्ष लागवड करावी.
ह्यावेळी वृक्ष लागवड व सत्कार प्रसंगी बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रताप भोस,सहायक उपनिरीक्षक श्री कपिल मस्के साहेब,सतिश चव्हाण सर,भालेराव सर, बीट जमादार श्री मोहन चाठे सर, हाके सर, सावळेश्वर गावचे पोलीस पाटील श्री अनिल कांबळे,व गावातील नागरिक चिमणाजी काळबांडे, परमेश्वर रावते, मुकिंदा काळबांडे, बंडू काळबांडे, शिवाजी काळबांडे, बबन काळबांडे, विवेक रावते.