*प्रेमात नकार केलें जीवनाला बेकार*

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809
चंद्रपूर – ९सप्टेंबरला महाकाली परिसरात झालेल्या घटनेने पूर्ण बाबुपेठ परीसर हादरून गेलें असून महिलांसाठी हि चिंता जनक बाब झालेली आहे की नकार देणे हे कितपत महाग पडू शकतो हे या घटनेनंतर दिसून येत ९ सप्टेंबर सायंकाळी ६.०० वाजता महाकाली परिसरात प्रफुल आत्राम( वय ३६ वर्ष)नामक युवकांनी एका १८ वार्षीय तरुणीवर चाकूने प्राण घातक वार केला असून तिला गंभीर रीत्या जखमी केल्याची खळबळ उडाली आरोपीला पोलीस ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीला नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आपल्या जिवाशी झुंज देत मात्र तीन दिवसानंतर आपले अखेरचे श्वास घेत जीवनाशी पाठ फिरवली. तिचे शव चंद्रपूरला अंत्यसंस्कार करण्यासाठी आणले परन्तु तिला न्याय मिळावा व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी किमान दोन तीन तास नेताजी चौकात आंदोलन करण्यात आले होते तेव्हा त्यांची प्रश्न सोडवण्यासाठी थेट माननीय किशोर भाऊ जोरगेवार हे मान्यवर उपस्थित झाले व पीडित च्या परिवाराला आर्थिक मदत केली शिवाय त्यांची सांत्वना केली.
पीडित व आरोपी प्रफुल आत्राम यांची ओळख काही वर्षांपूर्वी तिच्या घरी झाली होती घर काम चालू असताना आरोपी प्रफुल तिथे कामाला आला होता त्यात त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्या मधून एकमेका प्रती आकर्षण निर्माण झाले त्या आकर्षणला प्रेम समजून प्रफुल तिला अधिकाधिक मानसिक त्रास देऊ लागला त्यासाठी पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती मात्र पोलीस निरीक्षक हे तक्रारी कडे दुर्लक्ष केले होते परिणामी तिला आज आपला जीव गमवावा लागला प्रफुल हा विवाहित असून काही कारणांमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती