गडचांदूर मधील जोगी नगर व मेश्राम लेआउट मध्ये झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या दरबारी – सुरज ठाकरे

59

गडचांदूर मधील जोगी नगर व मेश्राम लेआउट मध्ये झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या दरबारी – सुरज ठाकरे

गडचांदूर मधील जोगी नगर व मेश्राम लेआउट मध्ये झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या दरबारी* - *सुरज ठाकरे*
गडचांदूर मधील जोगी नगर व मेश्राम लेआउट मध्ये झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या दरबारी – सुरज ठाकरे

कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906

गडचांदूर:- सविस्तर वृत्त असे की चार दिवसा आधीच युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी जोगी नगर व मेश्राम लेआऊट मधील रहिवाशांच्या आग्रहास्तव याठिकाणी भेट दिली. असता तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या व हा परिसर विकासापासून दूर असल्याचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की जोगी लेआऊट संपुर्ण व मेश्राम लेआऊट मधील काही भागाची कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी न अकृषिक न करता व रहिवासी परवानगी न घेऊन कागदपत्रांची पूर्तता न करता बेकायदेशीर रित्या ले-आऊट टाकून अशिक्षित व भोळ्या भाबड्या गरीब लोकांना विकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्या गेल्याची गंभीर बाब जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी उघडकीस आणली.

गडचांदूरचे नगर उपाध्यक्ष शरद जोगी व यांचे सहकारी यांनी धोकाधडी करून जाणीवपूर्वक लोकांची फसवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून अविकसित लेआउट शासनाची कुठल्या व कसल्याही प्रकारची परवानगी न घेता टाकल्यामुळे त्याठिकाणी लोकांना रस्ते, पाणी, वीज, नाली यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. ज्याचे परिणाम लोकांना ये-जा करण्याकरिता बनविलेल्या रस्त्यावर कुठला व कसल्या प्रकारचे डांबरीकरण नाही. कच्या रस्त्यांमध्ये मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. व याच बरोबर रस्त्याच्या काठी नाल्यांची सुविधा नसल्याने सांडपाणी सर्व रस्त्यावर येऊन साचून असते. व येथील वस्तीमध्ये विजेचे पोल या लेआऊटमध्ये काही भागात नसल्यामुळे आजही तेथील लेआऊटमधील लोकांना अंधारामध्येच जीवन जगावे लागत आहे. व आजूबाजूचा परिसर विकसित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला आहे. ज्यामुळे दररोज तेथील वस्तीमध्ये कुणाच्या ना कुणाच्या घरी साप निघल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात .अशी माहिती तेथील सर्प मित्रांनी देखील दिली. जर दुर्दैवाने विषारी सापाच्या दंशाने कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न श्री सुरज ठाकरे यांनी प्रशासनासमोर मांडला.

रस्त्यावरील पथदिवे काही भागात नसल्याने रात्रीच्या वेळेत काही दिसत नाही. ही सर्व बाब जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी सोशल मिडीयाद्वारे थेट लाईव्ह येऊन तेथील सत्य परिस्थिती प्रशासनासमोर व जनतेसमोर आणताच सर्वप्रथम ह्या अनधिकृतरित्या लेआऊट टाकणाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणाची सारवा-सारव करण्याचे प्रयत्न नगर उपाध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. याशिवाय नगर उपाध्यक्ष यांच्यावर खोट्या घरटॅक्स पावत्या देण्याचा देखील आरोप लागलेला आहे. म्हणजेच हे नगर उपाध्यक्ष नेमके या भागात ४२० शीच करीत आहे की काय? असा प्रश्‍न गडचांदूर येथील त्रस्त नागरिकांना पडलेला आहे. अशा खोटारड्या माणसाला निवडून देऊन खूप मोठी चूक झाली असे गडचांदूर येथील मतदार बोलत आहेत.

या सर्व प्रकाराला लेआऊट टाकून विकणारे जबाबदार असल्याबाबतची तक्रार सुरज ठाकरे यांनी (विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नागपूर) यांना आज लेखी स्वरूपी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे. शासनाची मान्यता नसताना कागदपत्रांची पूर्तता नसलेला लेआउट टाकून विकणे हा फौजदारी गुन्हा आहे. व सदर लेआऊट टाकून विकणाऱ्यांवर तथा लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष श्री. सूरज ठाकरे यांनी या निवेदनामध्ये केली आहे. या निवेदनासोबतच जनसामान्यांकडून फसवणूक करून लिहून दिलेली कागदपत्रे देखील पुरावा म्हणून या अर्जासोबत त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिली आहे. सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस महानिरीक्षक यांनी दिले आहेत, जे लवकरच चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांना प्राप्त होतील व या संदर्भामध्ये लवकरच चौकशी सुरू होण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहेत. यामुळे अनधिकृतपणे लेआउट टाकून जनसामान्यांची फसवणूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. लवकरच चौकशीचा बडगा त्यांच्यावर उभारल्या जाणार असल्याने भविष्यामध्ये अटक देखील होण्याचे चिन्ह याठिकाणी आहे. आता यातून हे भू-माफिया स्वतःला कसे वाचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.