घुग्घुस : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

55

घुग्घुस : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

घुग्घुस येथे युवकाची आत्महत्या*
घुग्घुस येथे युवकाची आत्महत्या

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्घुस:- घुग्घुस, शालिकराम नगर येथे 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि. 14 सप्टेंबर) उघडकीस आली. संतोष बलवीर वर्मा (रा. शालिकराम नगर, घुग्घुस) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. 

मंगळवार सकाळी संतोष बलवीर वर्मा (28)  या युवकाने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पोलिस स्टेशन घुग्घुस येथे माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविला. घुग्घुस पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मृतक संतोष बलवीर वर्मा याचे पश्चात कुटुंबात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.