वाराणसी येथील साधारण कुटुंबातील शेतकरी जयप्रकाश सिंह यांनी गहू, तूर व अन्य शेकडो प्रजाती शोधून रचला इतिहास.

✒भगवान चांदेकर ✒
उमरी प्रतिनिधी
सावनेर, 13 सप्टेंबर:- जयप्रकाश सिंह एक साधारण शेतकरी परिवारातले असून त्यांनी मेहनत व परिश्रम करून आपल्या स्वतःच्या मेहनतीने धान, गहू, हरभरा इत्यादी जैविक इत्यादी उत्पन्न त्यांनी तयार केले असून, त्यांनी सन 1997 पासून धान, अरहर, गहू व अन्य भाजीपाल्याच्या जवळपास 200 प्रजातीचा शोध लावला. 120 गव्हाच्या वानाच्या शोध लावला तसेच आठ प्रकारच्या अरहर प्रजातीच्या शोध सुद्धा जयप्रकाश सिंह यांनी लावला. या प्रजाती पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांनी जास्तीचे उत्पादन घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला. या वानामुळे शेतकऱ्यांना 50% खाद्य सुद्धा कमी लागत असून जास्तीचे उत्पादन शेतकरी घेत आहे. जयप्रकाश सिंह यांच्या बियानामुळे शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. उत्तर प्रदेश शोध सल्लागार समिती मध्ये सन 2017 पर्यंत सदस्य राहिलेले आहे. उत्तर प्रदेश सरकारने जेपी 131, अरहर जेपी 09 ला मान्यता सुद्धा मिळाली आहे.सन 2002 मध्ये महामहिम राष्ट्रपती अब्दुल कलाम, महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कृषक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जेपी 151 प्रती एकर उत्पादन 26 क्विंटल गव्हाचे उत्पादन होत आहे. गव्हाच्या उंबया 4 ते 6 इंची पर्यंत लांब असून जवळपास 65 दाणे राहत असून हा गहू हवेने सुद्धा पडत नाही. अशा प्रकारच्या गहू असून तसेच त्यांनी भाजीपाल्याच्या बियाना मध्ये टमाटर, वांगी, मिरची, कुलता लवकि, गिलची, गाजर, मेथी, साम्बार, पालक, पत्ता गोबी इत्यादी प्रकारच्या भाजीपाल्याचे बियाणे सुद्धा त्यांच्याकडे मिळत असतात. ते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मोफत सॅम्पल सुद्धा देत असतात.
शेतकरी सुखी समृद्धी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे जयप्रकाश सिंह यांच्या पत्ता श्रीनाथ सीड्स ॲड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड वाराणसी उत्तर प्रदेश असा असून शेतकऱ्यांनी या बियाण्याच्या वापर करावा जेणेकरून शेतकरी सुखी होईल.