अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने शेतातील पीक नेले खरवडून. तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सावनेर यांना निवेदन.

56

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने शेतातील पीक नेले खरवडून.
तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सावनेर यांना निवेदन.

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने शेतातील पीक नेले खरवडून. तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सावनेर यांना निवेदन.
अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने शेतातील पीक नेले खरवडून.
तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सावनेर यांना निवेदन.

✒अनिल अडकिने ✒
सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.9822724136
सावनेर,14 सप्टेंबर:- परतीच्या पावसाने संपुर्ण विदर्भात हाहाकार माजवला आहे. पुर्ण येऊन अनेक शेतक-याचे पुर्ण पीक उदवस्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामूळे विदर्भाती शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सरकार काही मदत जाहिर करते काय या कडे विदर्भातील शेतक-यांच लक्ष लागल आहे.

नागपुर जिल्हातील सावनेर पहिलेपार येथील शेतकरी नंदकिशोर श्रावण झाडे, शेत सर्वे नंबर-1072 यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे आलेल्या कोलार नदीच्या महापुराने कापूस, तूर पीक पूर्णता नष्ट झाले. 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री आलेल्या महापुरामुळे 2 दिवस शेतातून पाणी वाहत असल्याने पिक संपूर्ण पणे नष्ट झाल असलेचे चित्र आहे. तसेच इतर शेतकऱ्यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकरी नंदकिशोर श्रावण झाडे यांचे दोन लाख रुपयांच्या वर नुकसान झाले. त्यांच्यावर या अतिवृष्टीमुळे कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे.8 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली असून सहा दिवस लोटले तरी स्थानिक पटवारी, तहसीलदार यांनी साधी पाहणी सुद्धा केलेली नाही तर पंचनामा काय करणार? ही नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी या आशयाचे निवेदन तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार सावनेर यांना देण्यात आले.