उमरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्ता गेला वाहुन.

✒भगवान चादेकर ✒
अमरी प्रतिनिधी
उमरी:- उमरी येथे आलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी पुलाच्या वरून वाहत असल्याने रस्ता वाहून गेला. त्यामूळे जिल्हा मुख्यालया पासून उमरी आणि आजुबाजुचा परिसराचा संपर्क टुटला आहे.
उमरी भरतपुर येथील उमरी तलाव ओवरफ्लो झाल्यामुळे पुलावरून पाणी फेकण्यात आलं ओवरफ्लो 377 पॉईंट सात लेवल 7 सेंटीमीटर ओवरफ्लो 120 मिली मिटर पाऊस झाला असून पाणी पुलावरून वाहत आहे, तसेच दिनांक 9 सप्टेंबरला आलेल्या संततधार पावसामुळे पुलावरून जवळपास साडेतीन फूट पाणी जवळपास सहा तास पेक्षा जास्त वाहत असल्यामुळे फुलाच्या जवळील रस्ता पूर्णतः वाहून गेला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुद्धा पाणी शिरलं तसेच लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं आज (दि. 14) ला आलेल्या संततधार पावसामुळे पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने फुलाची व रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. पाऊस सतत सुरू असल्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी उमरी वासियांनी सतर्क राहावे पुलावरुन पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये, अशा आशयाची दवंडी ग्रामपंचायत उमरी (भ) तर्फे देण्यात आली. गावातल्या लोकांनी सतर्क राहावे व शाळेत आश्रय घ्यावा अशा सूचना रेखाताई चांदेकर सरपंच ग्रामपंचायत उमरी (भ) तर्फे देण्यात आलेल्या आहे.