राजस्थान अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार.
बाडमेर:- जिल्ह्यातील शिव पोलिस स्टेशन परीसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गावातीलच दोन नराधमांनी तरुणांनी घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. बलात्कारानंतर नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.
देशभरात मुलींवर बलात्काराची घटना कमी होण्याएवजी मोठ्या प्रमाणात वाढतच आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतांना राजस्थानमधिल बाडमेर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कारच्या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कुटुंबातील अन्य सदस्य मत देण्यासाठी गेले होते. कुटूंबाच्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांची शासकीय रूग्णालयात भेट घेतली आहे. पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भीड चौकीतीळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि पोलिसांना प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने मला दोन मुलांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. एका मुलाने मला शिवीगाळ केली, एकाने व्हिडिओ बनविला आणि फोटो काढले. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.
जिल्हाधिकारी विश्राम मीणा म्हणाले की, पंचायतीमी राज निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान सुरू होते, कुटुंबातील सदस्य मत देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मुलांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण लेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. संशयितांची चौकशी केली जात आहे. राजस्थानमध्ये गेहलोत सरकारमध्ये सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. राजस्थानच्या बाडमेर येथे बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गावातीलच दोन तरुणांनी घडवून आणली. सामूहिक बलात्कारानंतर नराधमांनी अश्लील व्हिडीओ आणि फोटोही काढले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहेत.