*जालना: पुरामुळे शेती बर्बाद, मराठा आरक्षण नसल्यानंमुळे नोकरी बर्बाद; तरुणाची गळाफास घेऊन आत्महत्या.*

*✒ सतिश म्हस्के ✒*
*जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010*
जालना,15 सप्टेंबर:- जालना जिल्हातुन एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याचे दिसुन येत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी राज्यभर मोठ्या संख्येनं आंदोलनं केली होती. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षणही जाहीर करण्यात आलं होतं. पण अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुणांच्या पदरी निराशा आली आहे. अशातच जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपुर्ण महाराष्ट्र हादळला आहे.
या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने महापुरजन्य परस्थिती दिसुन येत आहे. या ओलादुष्काळामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही.
अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हवालदिल तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परतूर तालुक्यातील आष्टी येथील येणोरा गावातील रहिवासी आहे. मृत सदाशिव हा मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्यानं इलेक्ट्रीशनचा कोर्सही केला होता.
मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी सदाशिव आपल्या गावाकडे येणोरा येथे आला होता. त्याला घरी चार एकर शेती आहे. मात्र गावाकडेही सतत पाऊस असल्यानं त्याला ओला दुष्काळाचा सामना करावा लागला.
पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पिकंही करपून गेली होती. एकीकडे नोकरी सोडली आणि दुसरीकडे शेतीचं नुकसान झाल्यानं सदाशिव आर्थिक विवंचनेत सापडला होता. यामुळे हवालदिल झालेल्या सदाशिवनं आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं आत्महत्येचा कारणांचा खुलासा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.